गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात विधानसभेत खडाजंगी; अध्यक्षांचा हस्तक्षेप, कारण काय?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२३ । मुंबई । विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेकविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली.

आदित्य ठाकरे म्हणाले, सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचा खातेवाटप होतो. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. प्रत्येक दिवशी खातेवाटप होतो. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो. आम्ही सगळे आमच्या मतदारसंघातून येतो. महाराष्ट्रात आम्ही आवाज देतो. यावर, विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांची यादी मी काल सभागृहात वाचून दाखवली. त्यामुळे ह्या प्रश्नाच चर्चा नको.

मायच्या पोटी कोणी हुशार होवून जन्माला येत नाही

गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे फार अभ्यास करुन आले आहेत. मला माहित आहे. ऐनवेळी सर्व प्रश्न आले. यावेळी आदित्य ठाकरे मध्ये बोलत होते. तर गुलाबराव पाटील म्हणाले. मायच्या पोटी कोणी हुशार होवून जन्माला येत नाही. तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहिती असतील. या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना शांत केले.

दरम्यान, इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवदेन केले. घटनेबाबतची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. बचावकार्य करणाऱ्यांचे कौतुक करत दुर्घटनाग्रस्त लोकांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.


Back to top button
Don`t copy text!