‘कारवार एव्हीशन’मध्ये विमान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
सकारत्मक रहा, तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करताना आवश्यक गरजा पूर्ण करा; परंतु प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका, आनंदी व सकारात्मक जीवनशैलीमधून कॅन्सरवर सुद्धा सहज मात करता येते, असे प्रतिपादन प्रख्यात आर्मी टेस्ट पायलट आणि कॅन्सरवर यशस्वी मात केलेले निवृत्त ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू यांनी केले.

शनिवार, दि.३ ० सप्टेंबर रोजी कारवार एव्हीएशन अकॅडमी यांच्या वतीने विमान क्षेत्रातील ब्रिगेडियर अमरदीप सिद्धू यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी कारवार एव्हीएशनचे संचालक नेव्हील भरूचा, वरिष्ठ व्यवस्थापक प्रथमेश पारेख, विमान प्रशिक्षक दीपांशू कुमार, माधवराज सिंग, अभियंता मयूर जगताप, अलोक ओझा, समन्वयक अधिकारी वैभव शहा, चंद्राणी रे आदी अधिकारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कॅन्सरवर विजय मिळवणे हे कॉकपिटमधील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यापेक्षा वेगळे नाही. कॅन्सर झाल्यावर मानसिक खंबीर रहा, कॅन्सर दवा, दुआ व योगाच्या माध्यमातून बरा होऊ शकतो, यावर विश्वास ठेवा. त्याचा बाऊ करू नका. सकारात्मक जीवनशैली ठेवल्यास कॅन्सरवर सहज व नक्की विजय मिळवून नवीन जीवन प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे झटपट श्रीमंत व सर्व अपेक्षा पूर्ण होण्याचे स्वप्न पुरे करताना तणाव निर्माण होतो. त्यामुळे कॅन्सर पेशी निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे जीवनात तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा, असेही सिद्धू यांनी सांगितले.

ऑन ड्युटी असताना वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सर असताना मात करून पुन्हा यशस्वीपणे कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर सेवानिवृत्ती हे सिद्धू यांचे वैशिष्ट्य असल्याचे अकॅडमीचे समन्वयक वैभव शहा यांनी सांगितले.

सिद्धू यांच्याविषयी

आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे ६४ वर्षांचे प्रतिष्ठित भारतीय लष्कराचे दिग्गज आणि त्यांच्या लॉग बुकमध्ये जवळपास ८००० फ्लाइंग तास आणि ५३ विमानांचे प्रकार असलेले प्रायोगिक चाचणी पायलट.

१९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय सैन्यासोबत उड्डाण केलेल्या विंटेज भारतीय निर्मित पुष्पक विमानाचे नूतनीकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २०११ मध्ये एएसीच्या २५ वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये त्याने तिला देशभरातील युद्धांशी संबंधित सर्व ऐतिहासिक हवाई तळांवर उड्डाण केले. पुन्हा एकदा १९६५ च्या युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी उत्सवादरम्यान सप्टेंबर २०१५ मध्ये अशीच मोहीम हाती घेण्यात आली.

२०१४ मध्ये त्यांना स्टेज ४ नॉन हॉजकिन्स लिम्फोमा असल्याचे निदान झाले. कॉकपिटमधली ही दुसरी आणीबाणी म्हणून हाताळत, त्यांनी आपल्या डॉक्टरांवर आणि औषधांवर पूर्ण विश्वास ठेवला. परम इच्छाशक्तीच्या जोरावर ते नऊ महिन्यांच्या मनाने पुन्हा कॉकपिटमध्ये परतला. तेव्हापासून ते सक्रियपणे उड्डाण करत आहेत आणि सूचना देत आहेत, त्यांच्या फोलिओमध्ये तीन विमान प्रशिक्षणमधील पायलट परवानेदेखील जोडले गेले आहेत.

केवळ विमान पायलट, अभियंते कारवार एव्हीएशन अकॅडमी बनवत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवत असताना कॅन्सरपासून मुक्तता मिळवलेल्या ब्रिगेडियर ला ‘प्रेरक व्याख्याना’साठी बोलावून विद्यार्थ्यांना वैचारिक खुराक देणारी भारतातील एकमेव अकॅडमी असल्याचे ब्रिगेडियर सिद्धू यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!