दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जावली (ता. फलटण) गावामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयाच्या कृषी दूतांकडून करण्यात आले होते. शेतीसाठी रोपांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच रोपांची वाढ सुरक्षितरित्या होणे गरजेचे आहे. यासाठी जावली गावातील ग्रामस्थांना व तरुणांना फलटण येथील कृषी महाविद्यालयातून आलेल्या कृषीदूतांनी रोपवाटिका व्यवस्थापन करणे ही काळाची गरज, या विषयावर माहिती दिली.
यावेळी रोपांची निगा व संरक्षण कशा प्रकारे करावे व त्यासाठी आपण कशा प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पिकांवर होणार्या वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव व त्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजेत, कमीत कमी खर्चात निरोगी बी-रोपे कशी वाढवावीत, याविषयी कृषिदूतांनी जनजागृती केली.
कार्यक्रमास जावली गावचे कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांनी रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर शेतकर्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा घालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अमन सकपाळ, ओंकार पिंगळे, गौरव कापरे, गजानन पाटील, प्रणव डुकरे, प्रद्युम्न शिंदे, अभिषेक पवार या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.