
दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड 2021-22 अंतर्गत कृषिदूत आदित्य जाधव शेतकर्यांना जैविक शेतीविषयी मार्गदर्शन करत आहेत.
कृषिदूत आदित्य जाधव यांनी राजाळे गावातील शेतकर्यांना जैविक शेतीचा फायदा व त्याचे महत्व पटवून दिले. कृषिदूत आदित्य जाधव यांनी शेतकर्यांना गांडूळ खत कसे तयार करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर या कार्यक्रमाअंतर्गत शेतकर्यांना माती परीक्षण कसे करावे, पिकांमधील अन्नद्रव्य कमतरता, बीज प्रक्रिया, फळझाडांची कलम कसे करावे, पीक नियोजन व शासनाच्या शेतीविषयक विविध योजना, कीडरोग नियंत्रण औषध फवारणी, तणनाशक नियंत्रण फवारणी, मशिनद्वारे दूध काढणे, साठवणीत धान्यावरील कीड नियंत्रण, मुरघास बनवण्याची प्रक्रिया, कमी खर्चात जनावरांसाठी पोषक असे खाद्य तयार करणे, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करणे, गादीवाफा तयार करणे, शून्य ऊर्जा शीतकक्ष याबद्दल माहिती दिली व प्रात्यक्षिके करून दाखवली.
या उपक्रमासाठी कृषिदूत आदित्य जाधव याला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर , कार्यक्रम प्रमुख प्रा.एन.एस. ढालपे, प्रा.ए. एस.नगरे, डॉ.व्ही. पी. गायकवाड, प्रा. एस. वाय. लाळगे , प्रा. जी. एस. शिंदे व इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.