दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसओरस येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी गिरवी (ता.फलटण) येथील शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कृषिदूत मयुर लालासाहेब पवार व कृषिदूत सुरज संतोष बोडरे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या उपक्रमांतर्गत कृषिदूतांनी ग्रामीण कृषी जागृकता व विकास योजनेच्या अभ्यासक्रमांतर्गत गिरवी येथील शेतकर्यांना आधुनिक शेतीची माहिती व प्रात्यक्षिके सादर करुन शेतकर्यांना आधउनिक शेती कशी करावी याची माहिती मिळाली.
सदर उपक्रमासाठी कृषिदूतांना प्राचार्य जंगले, डॉ.पावसकर, प्रा.राहते, प्रा.गायकी, प्रा.देशपांडे, प्रा.सकपाळ, प्रा.राणे, प्रा.पाथाडे व गिरवी गावचे प्रगतशील बागायतदार विरसिंग कदम आणि संतोष बोडरे आदींचे मार्गदर्शन लाभले.