
दैनिक स्थैर्य । 30 मे 2025। सातारा। दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना दरड कोसळत असल्यास काय खबरदारी घ्यावयाची याबाबतचे प्रशिक्षण पुणे यशदा पथकाने कराड व कोयनानगर येथे दिले. कोयनानगर येथे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनामध्ये दरडप्रवण व पुरप्रवण भागामध्ये दरडी कोसळणेच्या अनुषंगाने पुर्व संकेत ओळखणे तसेच आवश्यक घ्यावयाच्या खबरदारीच्या सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार तसेच गॅसगळती होणे, आग लागणे याबाबत तातडीचे करावयाचे उपायोजनेचे प्रशिक्षण व अपघात ग्रस्त परिस्थीती उद्भवल्यास करावयाचे उपयोजनेबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.

