दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सोनवडी (खुर्द), ता. फलटण येथे फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांत माती परीक्षण व पाणी परीक्षण हा कार्यक्रम फलटणच्या उद्यानकन्या अमृता काशिद, शिवानी गलांडे, स्नेहल शिंदे, वर्षा खराडे, अस्मिता माळी, क्रांति गोसावी यांनी आयोजित केला होता.
ग्रामीण भागातील शेतकर्यांना माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्ये व पिकातील अन्नद्रव्यांचा अभाव टाळण्यासाठी केले जाणारे उपाय ही सर्व माहिती या कार्यक्रमामार्फत दिली गेली. तसेच गावातील शेतकर्यांना माती परीक्षण म्हणजे काय? माती व पाणी परीक्षणाचे फायदे, जमीन पोत सुधारणा करण्यासाठी घ्यावयाची उपायोजना, या सर्व विषयांवर कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. सौ. प्राजक्ता मेटकरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्रीमती शालन सूर्यवंशी, उपसरपंच श्री. शरद सोनवलकर तसेच बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. डी. निंबाळकर सर व कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे सर, प्रा. डॉ. अश्विनी अभंगराव, माती व पाणी परीक्षणतज्ज्ञ सौ. डॉ. प्राजक्ता मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.