मराठमोळी परंपरा जपत ‘ट्रेल’वर होणार साजरा गुढीपाडवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०९: गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी तो पारंपरिक नव वर्षारंभाचा उत्सव असतो. ट्रेल हा भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म मराठमोळी परंपरा जपत यंदाचा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलद्वारे धमाल आणि आकर्षक इन-अॅप अॅक्टिव्हिटीजचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

ट्रेलवरील संजना पंडित, केतकीजोईल, मैथिली पवार-म्हात्रे, विश्वास पाटील आणि राखी सोनार यांसारखे सामग्री निर्माते हा सण घरीच राहून अधिक रंजकपणे कसा साजरा करता येईल, यासाठी अनेक कल्पना मांडतील. यात महाराष्ट्रीयन हेअरस्टाइलचे व्हिडिओ, गुढीपाडव्यासाठीचे विविध पेहराव, आमरस कृती इत्यादींचा यात समावेश असेल.

महाराष्ट्राची संस्कृती आणि रंग अबाधित ठेवण्याची या प्लॅटफॉर्मने पूर्ण तयारी केली आहे. यासोबतच यूझर्सना माहिती व मनोरंजनाचा अखंड प्रवाह सुरूच आहे. तुम्ही महाराष्ट्रातील असाल अथवा नसाल ट्रेलवरील गुढीपाडवा एक संस्मरणीय ऑनलाइन उत्सव असेल.


Back to top button
Don`t copy text!