आंदोलन मागे घेण्याचे डॉ.भारत पाटणकर यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । सातारा । कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाविषयी सुरू असलेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलनाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांना आज दूरध्वनीद्वारे केले.

जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल असेही पालकमंत्री तथा कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. देसाई म्हणाले.

या पुनर्वसनाच्या कामी किती निधीची आवश्यकता आहे. तसेच या करिता काय करता येईल याची माहिती घेण्याचे आदेश समितीच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. अधिवेशनानंतर तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असेही श्री. देसाई यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!