
दैनिक स्थैर्य | दि. 08 ऑगस्ट 2024 | फलटण | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे तालुकानिहाय आढावा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये फलटण तालुक्याची सुद्धा विशेष बैठक घेण्यात येणार असून फलटण तालुक्याचा आढावा यावेळी घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब इवरे यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासन समन्वय ठेवून कामकाज करीत आहेत का? पात्र लाभार्थ्यांना समावेश होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे समिती कार्यरत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कोणतीही अडचणी येऊ नये; म्हणून सातारचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे विशेष आढावा बैठक घेणार आहेत असे ईवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.