भाजपने सुरुवात केली आहे, शेवट आम्ही निश्चित करू

पालकमंत्री ना.  शंभूराज देसाई ;भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप


स्थैर्य, 20 मार्च, सातारा :  “गर्दीत मला नेमका धक्का कसा लागला हे सुरुवातीला समजले नाही. मात्र जेव्हा हाताला जखम होऊन रक्त येऊ लागले, तेव्हा दुखापतीची जाणीव झाली.” हा सर्व प्रकार सुरू असताना पोलीस हे भाजपच्या घरगड्यांसारखे वागले .भाजपने सुरुवात केली आहे आता शेवट आम्ही निश्चित करूअसे पालकमंत्री ना.  शंभूराज देसाई म्हणाले

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना नेते व सातार्‍याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना घडली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना त्यांच्या उजव्या हाताला बँडेज केलेले दिसून आले.

घटनेनंतर त्यांना तात्काळ वैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार देण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती आणि रक्तस्त्रावही होत होता. तसेच त्यांचे मनगटालाही मार लागला होता. जखमेवर तातडीने ड्रेसिंग करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.ही दुखापत नेमकी कशामुळे झाली याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. डॉक्टरांनीही याबाबत निश्चित कारण सांगता येणार नसल्याचे सांगितले. जखम मध्यम स्वरूपाची असल्याचे त्यांनी ‘

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आज पार पडली. भाजपाने मोठा विजय मिळवत पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. दरम्यान, आजच्या निवड प्रक्रियेला हिंसक वळण लागले. या निवडीदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून, त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना भाजपा आणि शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि ढकलाढकली झाली. या गर्दीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर देसाई समर्थक आक्रमक झाले असून, याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
या राड्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. “पोलीस बळाचा चुकीचा वापर करून विरोधी सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर थेट मंत्री आणि लोकप्रतिनिधींवरच पोलीस धावून येत असतील, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे,” असे पाटील म्हणाले.
दुसरीकडे, आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रशासनावर टीका केली आहे. “आमच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतानाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढले. प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना हात वर करण्यास भाग पाडले,” असा खळबळजनक आरोप शिंदेंनी केला. “आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, आता याविरोधात रस्त्यावरची लढाई लढू,” असा इशाराही त्यांनी दिला.या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!