कोविड समर्पित हॉस्पिटलची पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी


स्थैर्य, बुलडाणा, दि.२५: सिंदखेड राजा तालुका मुख्यालयात कोविड समर्पित हॉस्पिटलची निर्मिती सुरू आहे. या नवीन होत असलेल्या कोविड समर्पित हॉस्पिटलची पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी करून स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन युद्धपातळीवर लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची आदेश दिले.

सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसापासून तालुका मुख्यालयात अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल होण्याची मागणी होती. ही मागणी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असून लवकरच पुरातत्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयात 100 बेडचे कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये एकूण 30 ऑक्सिजन बेड असून 70 सर्वसाधारण बेड आहेत. तर महिलांसाठी विशेष कोविड कक्ष निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी नवीन कक्ष सुरू करण्याचे आदेश पालक मंत्री यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तयारीत राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड नाजेर काजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोगटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार सुनील सावंत यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!