दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सोलापूर । कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (गळीत धान्य) सन 2022-23 अंतर्गत सोयाबीन बियाणाचे वाटप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
नियोजन भवन येथे कृषि विभागाच्या दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोयाबीन बियाणे वाटप केले. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, शहाजीबापू पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या हस्तेही शेतकऱ्यांच्या कुटुंबांना बियाणे वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, दक्षिण सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी उपस्थित होते. श्रीमती सुमन नारायण कोले (उळे), विठ्ठल रखमाजी बनसोडे (मुळेगाव) सिध्दाराम सुरेश म्हेत्रे (मुळेगाव), श्रीमती अनिता सुरेश गायकवाड (होनमुग), भीमाशंकर नागनाथ विभूते (तांदूळवाडी), सागर राजशेखर नारायणे (हत्तूर), सोमनाथ काशिनाथ कोळी (हत्तूर), रमेश पांडूरंग केत (मुळेगाव), शिवाजी मुक्ताना माने (मुळेगाव) आणि माणिक कन्याराम काळे (मुळेगाव) यांना बियाणाचे वाटप करण्यात आले. चांगली पेरणी करून पीक चांगले काढण्याच्या शुभेच्छा पालकमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यात सोयाबीन बियाणाचे 290 किटचे मोफत वाटप करावयाचे असून त्यापैकी आज प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते 10 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.