जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । नाशिक । जिल्हा परिषदेतर्फे शाळा, केंद्र व तालुकास्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली होती. आज महाकवी कालिदास कलामंदिर येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांच्यासह जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान

पहिला ग्रुप

दर्शिका नरेश वानखेडे इयत्ता 1 ली, जि.प.शाळा, दहिकुटे, मालेगाव

गणेश शांताराम किरकिरे इयत्ता 2 री, जि.प.शाळा, हिवाळी, त्र्यंबकेश्वर

शार्विल रघुवीर चव्हाण, इयत्ता 2 री, जि.प. शाळा,खडकीमाळ, येवला

दुसरा ग्रुप

स्नेहा दिनकर जोंधळे, इयत्ता 4 थी, जि.प.शाळा सोनांबे, सिन्नर

रेयांशू मंगलसिंह देवरे, इयत्ता 4 थी, जि.प.शाळा एकलहरे, दिंडोरी

आदित्य आदेश पवार, इयत्ता 4 थी , जि.प.शाळा, वडाळी खुर्द, नांदगाव 

तिसरा ग्रुप

प्रणव तुकाराम वाळुंज, इयत्ता 5 वी, जि.प.शाळा, मुसळगांव, सिन्नर

पूजा सोपान भुरके, इयत्ता 6 वी निफाड, जि.प.शाळा, खेरवाडी, निफाड

शरद धर्मराज भुसारे, इयत्ता 5 वी, जि.प.शाळा हिवाळी, त्र्यंबकेश्वर

चौथा ग्रुप

कार्तिक हेमंत मेघवत,इयत्ता 8 वी, जि.प. शाळा विद्यानिकेत, देवळा

दिपाली सोमनाथ दराने,इयत्ता 8 वी, जि.प.शाळा,वडाचीवाडी, इगतपुरी

स्वप्नील कांताराम कवडे, इयत्ता 8 वी, जि.प.शाळा, बाणगाव बु. नांदगाव

यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील उन्हाळी सुट्टीतील उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकला वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून साकारलेल्या कालाकृतींचे मन:पर्वूक कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुलींच्या सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेस पालकमंत्र्यांची भेट

या कार्यक्रमानंतर मुलींचे सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली. तसेच तेथील विद्यार्थींनीसोबत चर्चा करून आपण देशाचे भविष्य आहात, आपल्या कर्तृत्वामुळे नाशिक जिल्ह्याचे देशपातळीवर नाव अधोरेखित होणार आहे. देशातील हे मुलींचे पहिले प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रात आपणास आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशिक्षणार्थींना आश्वासित केले.


Back to top button
Don`t copy text!