चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अलिबाग, दि. 14 : निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल धनादेश सुपूर्द करण्यात आले.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार ग्रामपंचायतीतील चंद्रकांत धोंडू भगत, सुरेंद्र गंगाराम भगत, इकबाल सलीम कुलाबकर, शैनाज हसन बोरकर यांना प्रत्येकी  रु.1 लाख 50  हजार, तर धनाजी नरेश पाटील, लता रमेश पाटील, वैशाली शाम पाटील यांना प्रत्येकी रु. 15 हजार असे एकूण 6 लाख 45 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे, दिवेआगार ग्रामपंचायतीचे सरपंच, उदय बापट उपस्थित होते.

श्रीवर्धन तालुक्यातील तुरूंबाडी ग्रामपंचायतीतील दुर्गा दिलीप पाटील, संगीता हिराकांत दौले, कमला जनार्दन तांडेल, धर्म नरेश खोपटकर, रंजना तुकाराम खोपटकर, जनाबाई नामदेव चव्हाण यांना प्रत्येकी रु.1 लाख 50  हजार असे एकूण 9  लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे, तुरूंबाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रंजना फुटाक, उपसरपंच नरहरी फुटाक उपस्थित होते.

रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीतील मधुकर कृष्णा शिंदे, रु. 1 लाख 56 हजार, अमित नारायण पवार, 30 हजार 200, विलास तुकाराम कोल्हटकर, रु.1 लाख 60 हजार, सुरेंद्र जर्नादन साठेकर, रु.1 लाख 60 हजार, ज्योती जनार्दन धुमाळ रु.84 हजार 600 असे एकूण 5 लाख 90 हजार 800 रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते आर्थिक वितरित करण्यात आले. यावेळी माजी सभापती हेमंत कांबळे, मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, पंडित राठोड, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, ग्रामपंचायतीचे सरपंच मिना म्हात्रे, उपसरपंच अमित मोहिते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!