दैनिक स्थैर्य | दि. १२ जानेवारी २०२५ | फलटण |
पाडेगाव, ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२०२५ कार्यक्रमाअंतर्गत कृषी-बागायती वस्तूंच्या शास्त्रोक्त पॅकेजिंगवर गटचर्चा यावर प्रात्यक्षिक दिले.
या कार्यक्रमावेळी कृषिदूतांनी कृषी-बागायतीच्या वस्तूंच्या वैज्ञानिक पॅकेजिंग प्रक्रिया केलेली उत्पादने आणि त्याची साठवणूक या विषयी विविध प्रकारच्या पॅकेजिंग साहित्याद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन केले. शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते, ब्रँड तयार होतो, खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात तसेच पॅकेजिंगद्वारे वस्तू विक्रीसाठी आणि हाताळणीसाठी अधिक सोयीस्कर होते. याविषयीचे शेतकर्यांना महत्त्व सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत इंगोले धनंजय, काटकर सौरभ, कांबळे रोहन, केसकर राहुल, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजित व गोडसे आदित्य यांनी हा उपक्रम पार पडला.