केंद्रीय मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते फलटणमध्ये नूतन वारकरी भवनचे भूमिपूजन : माजी नगरसेवक अशोकराव जाधव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण येथे शुक्रवार दि. ०६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर वारकरी भवनचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. तर या सोहळ्यास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी महती माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.

यावेळी बोलताना अशोकराव जाधव म्हणाले कि, फलटण येथे माजी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर नूतन वारकरी भवनचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते माजी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर नूतन वारकरी भवनचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. तरी फलटण तालुक्यातील सर्व वारकरी बांधवानी यावेळी उपस्थित रहावे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!