
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : शहरातील रविवार पेठेत, पोतेकर बोळ येथे श्री गणेश मंदिराचा भूमीपूजन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर, गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा भूमीपूजन समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले यांनी केले आहे.