दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । मंगेशकर कुटुंबाचे गेली २० वर्षे कौटुंबिक संबंध. फलटण आणि मंगेशकर हा ऋणानुबंध शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज दीदींचे निधन हे आम्हा सर्वांना फलटणकरांना अतीव वेदना देणारे.
फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि मी प्रथम २००१ मध्ये ‘ प्रभूकुंजला दीदींना एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. आणि आज तो दिवस आठवला… सायंकाळची वेळ होती. मी आणि रामराजे भेटीस गेलो. दरवाजात आदरणीय उषाताई यांनी स्वागत केले. केवळ १० मिनिटांची भेट होती पण अर्धा तास ही भेट संगीत, क्रिडा, आरोग्य अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या. भारतरत्न दीदींचे आणि रामराजे यांचे संवाद आजही आठवले तरी मनाला एकप्रकारे जीवनाचे सार्थक असे वाटते.
आमची “विद्यावैभव प्रकाशन” ही संस्था… या संस्थेच्या दशवार्षिक सोहळ्याला त्यांची उपस्थिती, आणि “माझी माय” या पुस्तकाला
त्यांनी दिलेली प्रस्तावना…. हा सोहळा प्रभुकुंज येथे मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत झाला.
आदरणीय दीदींनी त्यावेळी दिलेले आशीर्वादामुळे आज आम्ही यशस्वी व्यवसाय करीत आहोत. माझा थोरला मुलगा चि. डॉ. अमेय याच्या विवाह प्रसंगी मंगेशकर कुटुंबाची उपस्थिती आणि दीदींनी पाठविलेल्या आशीर्वादाची आज प्रकर्षाने आठवण येते. खूप दुःख झाले…. शब्द अपुरे आहेत.
काय सांगु उषाताई…. आदरणीय दीदी, त्यांचे सर्व कुटुंब आमची शक्ती आहे .
ईश्वराला प्रार्थना…. दीदी आपण आमच्या सदैव हृदयात आहात. सदैव पाठीशी रहा.
सर्व कलाकारांच्या वतीने आदरणीय लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !!