महाराष्ट्राच्या लाडक्या ‘पु.लं.’ना विनम्र अभिवादन – अजित पवार, उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 12 : “‘पु.ल.’स्पर्श होताच, दुःखे पळाली…

नवा सूर, आनंदयात्रा मिळाली…

निराशेतून माणसे मुक्त झाली…

जगू लागली, हास्यगंगेत न्हाली…” असं ज्यांचं वर्णन कवीवर्य मंगेश पाडगावकरांनी केलं ते आनंदयात्री पु.ल.देशपांडे अर्थात लाडक्या‘भाईं’चा आज स्मृतीदिन. भाईंनी त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वानं महाराष्ट्र हसवला, हसता ठेवला अन् घडवला देखिल. भाईंनी साहित्य व कलेच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केली व रसिकांना मनमुराद आनंद दिला. माणुसकीचा आदर्श निर्माण केला. नैतिकता, दातृत्वाच्या बाबतीतही ते श्रेष्ठ ठरले. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्रावर त्यांनी भरभरुनं प्रेम केलं. महाराष्ट्राचा गौरव वाढवला. ‘पु.ल.’नी महाराष्ट्र कायम हसता ठेवला, पुढेही ठेवत राहतील. असे ‘पु.ल.’ पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!