
दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । सातारा । शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					