क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन
स्थैर्य, फलटण : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर पुतळ्यासमवेत उपस्थित मान्यवर.
स्थैर्य, फलटण : तत्कालीन प्रति (पत्री) सरकारचे निर्माते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ज्येष्ठ नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या येथील पूर्णाकृती पुतळ्यास समता परिषद व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी दशरथ फुले यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शेगर धनगर समाज महासंघाचे प्रा. शिवलाल गावडे, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा सावता महाराज व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब ननावरे, प्रा. संपतराव शिंदे, कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, गुलाबराव दड्स, प्रा. रमेश आढाव, सुभाषराव भांबुरे हनुमंत शिरनामे,युवराज शिंदे दत्तात्रय बरळ,बबनराव मदने, प्रभाकर कर्चे आदी मान्यवर उपस्थित होते.