
दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.