पोंभुर्लेत ‘दर्पण’कारांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । फलटण । मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना २११ व्या जयंती निमित्त पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व देवगड तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुधाकर जांभेकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे, देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष कुळकर्णी, अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सचिव सचिन लळीत, कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाडेकर, अनिल राणे, महेश तेली, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे रोहित वाकडे, विपुल गुरव यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!