फलटण येथे बाळशास्त्री जांभेकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२२ । फलटण । मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना 176 व्या पुण्यतिथीनिमित्त (दि.17 मे) येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात पत्रकार युवराज पवार, अ‍ॅड.रोहित अहिवळे यांच्या हस्ते बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार शक्ती भोसले, रोहित वाकडे, चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली मंजरतकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, उपशिक्षक अरुण खरात, विशाल मुळीक, श्रीराम विद्याभवनचे बाळासोा भोसले, कृष्णात बोबडे यांची उपस्थिती होती.

स्वागत भिवा जगताप यांनी केले, आभार अरुण खरात यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!