
दैनिक स्थैर्य | दि. 10 एप्रिल 2025 | फलटण | महावीर जयंतीच्या निमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील भगवान महावीर स्तंभ येथे अभिवादन केले.
यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
महावीर जयंती निमित्त फलटण येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.