
दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । सातारा । राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.