
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025 । फलटण । येथील महात्मा फुले चौक येथे असणाऱ्या पुतळ्यास महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्यासमवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महात्मा फुले चौक येथे उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी सेल्फी सुद्धा काढला.