छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी परिवहनमंत्री श्री. परब यांनी राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!