महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । मुंबई । भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपसचिव प्रकाश येंदरकर, अवर सचिव विठ्ठल भास्कर, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ तसेच मागासवर्ग कर्मचारी संघटनेचे (मंत्रालय) अध्यक्ष भारत वानखेडे, पदाधिकारी भास्कर बनसोडे, सुभाष गवई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!