दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । अखिल मानवजातीच्या कल्याणाचे सार श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगणाऱ्या श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि त्यामागून येणाऱ्या गोपाळकाला, दहीहंडीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून जल्लोषात दहीहंडी साजरी करताना मंडळे आणि गोविंदांनी सुरक्षेची सर्व काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलेल्या शुभसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीत दहीहंडीला विशेष महत्त्व आहे. दहीहंडीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे एकत्रीकरण होत असते. कोरोनाच्या काळानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या दहीहंडीबाबत मंडळांनी आणि गोविंदांनी सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.