दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । सातारा । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.