दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । मुंबई । सामाजिक क्रांतीचे प्रणेते, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज मंत्रालयात पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
आमदार डॉ. देवराव होळी, आमदार शाह फारुख अन्वर, आमदार किसन कथोरे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक गायकवाड, अनु.जाती/जमाती/विजा-भज/इ.मा.व/वि.मा.प्र शासकीय निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनचे राज्य महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे, संघटनेचे राज्यध्यक्ष भारत वानखेडे, यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन वंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.