दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । मुंबई । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील, विशेष कार्य अधिकारी श्री. इंदलकर, कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.