स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२२ । मुंबई । स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी स्वराज्याची संकल्पना प्रथम मांडली. स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवला, त्यामागे शहाजीराजांच्या विचारांची, त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेची ताकद होती. त्यांच्या या दूरदृष्टीच्या विचारांमुळेच महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहिला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करून विनम्र अभिवादन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!