स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । मुंबई । “स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन.

उपमुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी आपल्या तेजस्वी विचारांनी, ओघवत्या वक्तृत्वाने आणि राष्ट्रप्रेमाच्या ऊर्जेने जगभरातल्या युवकांना कायमच प्रेरणा दिली. जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र स्वामी विवेकानंदांनी दिला. आपण दुर्बल आहोत, हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. जीवन जगताना कोणतेही एक ध्येय मनाशी बाळगावे, त्याचा आयुष्यभर ध्यास धरावा, तो विचार पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावावी, ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिली. राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी, त्यांच्या शिकवणीनुसार सर्व युवकांनी संघटीतपणे काम करावे, हीच स्वामी विवेकानंदांना खरी आदरांजली ठरेल.‘राष्ट्रीय युवक दिना’च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.”


Back to top button
Don`t copy text!