साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ११ :पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे महान साहित्यिक, थोर विचारवंत, समाजवादी नेते आदरणीय पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजींचा आज स्मृतीदिन. साने गुरुजी त्यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या रुपानं कायम आपल्यासोबत आहेत. या पुस्तकानं कितीतरी पिढ्यांची सोबत केली. त्यांना घडवलं, सुसंस्कारीत केलं. अनेकांना त्यांची ‘आई’ याच पुस्तकात गवसली. साने गुरुजी म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेलं, अस्पृश्यता, जातीभेद, अनिष्ठ रुढी, वाईट परंपरा संपवण्यासाठी जीवनभर संघर्ष केलेलं, स्वातंत्र्यानंतर  देश एकसंध ठेवण्यासाठी आंतरभारती चळवळ उभारणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सेवावृत्ती रुजवून देशाच्या भावी पिढ्या सुसंस्कृत, सक्षम करणाऱ्या या महान व्यक्तीमत्वाला, आज स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!