कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । मुंबई । “कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रजां’च्या काव्यप्रतिभेने मराठी भाषा समृद्ध झाली. तात्यासाहेबांच्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानं मराठी भाषेचा गौरव वाढवला. हजारो वर्षांचा गौरवशाली वारसा असलेली आपली मराठी भाषा, पुन्हा एकदा घराघरात बोलली गेली पाहिजे. मराठी भाषा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवहारातली मुख्य भाषा झाली पाहिजे. मराठी भाषेला ज्ञानार्जन, अर्थार्जनाची भाषा बनवून अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं, हीच स्वर्गीय तात्यासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे. स्वर्गीय तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रजां’च्या कार्याचं स्मरण करुन आदरांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!