उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मराठी रंगभूमी दिना’निमित्त शुभेच्छा


 

स्थैर्य, दि.५: उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी लोकजीवनाचं सांस्कृतिक वैभव प्रेक्षकांपर्यंत पोहचवून सर्वांना निखळ आनंद देणाऱ्या, सामाजिक प्रश्नांच्या सक्षम हाताळणीतून महाराष्ट्राचं वैचारिक प्रबोधन करणाऱ्या मराठी रंगभूमीच्या गौरवशाली वाटचालीबद्दल मराठी रंगकर्मींचं अभिनंदन करण्याचा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या सर्व रंगकर्मींचं तसेच मराठी रंगभूमीच्या रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!