कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन


पुणे, दि. १ :- कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही  श्री. अजित पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!