क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । सातारा । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छगन भुजबळ, मकरंद पाटील,महादेव जानकर, सरपंच साधना नेवसे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , मुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!