
स्थैर्य, मुंबई, दि. ३ : थोर स्वातंत्र सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२० रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरातील असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.