
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.