दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले . यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, उपजिल्हाधिकारी किर्ती नलवडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.