दैनिक स्थैर्य । दि.११ एप्रिल २०२२ । सातारा । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांच्यासह कार्यालयातील विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.