दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२३ | फलटण |
फलटणचे सुपुत्र व नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, सुप्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ, थोर विचारवंत डॉ. मो. स. गोसावी सर तथा आप्पासाहेब यांचे आज पहाटे २.३० वाजता नाशिक येथे दु:खद निधन झाले.
डॉ. गोसावी सरांचे पार्थिव नाशिक येथील बी. वाय. के. कॉलेज येथे सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक येथील वैकुंठभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. गोसावी सर यांच्या निधनाने फलटणकरांनी एक शिक्षणतज्ञ, थोर विचारवंत गमावल्याची प्रतिक्रिया फलटणच्या अनेक शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या मित्रांनी दिली आहे. फलटणच्या शिक्षण, साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.