दैनिक स्थैर्य । दि. 5 आक्टोंबर 2024 । फलटण । राज्यशासनाच्यातीने देशी गोवंश व पशुपालन करणार्या सेवाभावी संस्थासाठी प्रतिपशु 50 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा पाठपुरावा केला होता. श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्यावतीने अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनुदान मंजूर झाल्याबद्दल श्री सद्गुरु यशवंतबाबा गोपाल संस्थेच्यावतीने श्रीमंत रामराजे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गोशाळेचे अध्यक्ष सदाशिव जालिंदर कुंभार, सदस्य सदाशिव लक्ष्मण कुंभार, व्यवस्थापक स्वप्निल कुंभार यांनी केला.
युवानेते अक्षय गायकवाड यांच्याकडून बाब निदर्शनास
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कोळकी ग्रामपंचायतीचे डॅशिंग सदस्य अक्षय गायकवाड यांनी राज्यामध्ये सर्वप्रथम ही बाब विधान परिषदेचे सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. अक्षय गायकवाड यांनी सदरील बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर श्रीमंत रामराजे यांनी तातडीने पाठपुरावा सुरु केला. अक्षय गायकवाड यांच्यामुळेच संपूर्ण राज्यातील गोशाळांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.