
दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । सातारा । श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनलने सर्वच म्हणजे बाराही जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड दिला . विरोधकांनी मिळवलेल्या मतांनी सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करायला लावले आहे .
वाचनालयाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. विश्वस्त मंडळाच्या ४ तर कार्यकारी मंडळाच्या ८ अशा एकूण १२ जागांसाठी निवडणूक झाली. विश्वस्त मंडळासाठी सहा तर कार्यकारी मंडळासाठी बारा उमेदवारी असे एकूण 18 अर्ज दाखल झाले होते.
या निवडणुकीमध्ये ग्रंथमित्र पॅनलचे नेतृत्व अजित कुबेर यांच्याकडे होते. या पॅनलच्या वतीने विजय पंडित, एडवोकेट सचिन तिरोडकर, अनंत जोशी, डॉ. संदीप श्रोत्री यांनी विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला. श्रीनिवास वारुंजीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कार्यकारी मंडळासाठी ग्रंथमित्र पॅनलच्या विजयकुमार क्षीरसागर, प्रकाश शिंदे, वैदेही कुलकर्णी, डॉ. राजेंद्र माने, रवींद्र भारती- झुटिंग, प्रदीप कांबळे, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, श्याम बडवे यांनी विजय मिळवला. या ठिकाणी श्रीनिवास वारुंजीकर, मधुसूदन पत्की, विजय मांडके यांचा पराभव झाला.
या निवडणुकीसाठी एडवोकेट नितीन शिंगटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर एडवोकेट जयवंत परदेशी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले .
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय निवडणूक विजय उमेदवार…
विश्वस्त समिती विजयी उमेदवार
डॉ. संदीप श्रोत्री 179
विजयराव पंडित 167
अनंत जोशी 166
adv सचिन तिरोडकर 148
कार्यकारी मंडळ विजयी उमेदवार
रविंद्र भारती- झुटिंग 522
डॉ. राजेंद्र माने 497
डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर 486
वैदेही कुलकर्णी 479
डॉ. शाम बडवे 475
विजयकुमार क्षीरसागर 435
प्रदीप कांबळे 421
प्रकाश शिंदे 412
पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते
विजय मांडके १९३
मधुसूदन पत्की १७२
एड. अमित द्रविड १६९
श्रीनिवास वारुंजीकर १२७