शौर्यपदक विजेते मेजर साकलकर यांना ६ लाख रूपये अनुदान मंजूर


दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक अथवा सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शौर्यपदक अथवा सेवापदक प्राप्त करणाऱ्या सैन्यातील जवानांना अनुदान देण्यात येते.

या योजनेंतर्गत परम विशिष्ट सेवेसाठी शौर्यपदक विजेते नागपूर येथील मेजर प्रतर्दन गोपाळ साकलकर यांना शासनाने 6 लाख रूपये अनुदान मंजूर केले आहे. मेजर साकलकर यांना 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!