“शायनिंग महाराष्ट्र” भव्य प्रदर्शनाचा आज फलटण येथे भव्य शुभारंभ


दैनिक स्थैर्य । दि. २५ मार्च २०२२ । फलटण । फलटण शहरालगत, जाधववाडी ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स या मंगल कार्यालयात केंद्रीय मंत्रालयांतर्गत विविध विभागांचे भव्य प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून त्याचा शुभारंभ खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि प्रगतशील शेतकरी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते आज शुक्रवार दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत “शायनिंग महाराष्ट्र” हे भव्य दिव्य प्रदर्शन माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून स्वराज फौडेशन व सांसा फौडेशन आयोजित सदर प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दररोज खुले राहणार आहे.

संशोधन, शेती, सेवा, उद्योग, व्यवसाय वगैरे अनेक क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी प्रदर्शनास आवर्जून भेट द्या असे आवाहन करतानाच केंद्र शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी शायनिंग महाराष्ट्र २०२२ च्या या भव्य प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी व लाभ घ्यावा असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!